महाकुंभसाठी जात असाल तर थांबा!! ३० किलोमीटर पर्यत आहेत रांगा, ट्रेन रद्द, पाय ठेवायलाही जागा नाही, प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर…

प्रयागराज : सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी आहे. परिस्थिती अशी आहे की मुले, वृद्ध आणि इतर भाविक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. यामुळे परिस्थिती खूपच भयानक झाली आहे.
अडकलेल्या लोकांना पाणी आणि अन्नही मिळत नाही आहे.प्रयागराज रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता, सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात अडकलेले भाविक रेल्वे ट्रॅकवरूनच त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात आहेत. याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावर सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनीही ट्विट करून लोकांसाठी तात्काळ व्यवस्था केली जाईल, असे म्हटले आहे अखिलेश यादव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हजारो लोक रस्त्यावर अडकलेले दिसतात आणि वाहने मध्येच अडकलेली दिसतात. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारला महाकुंभमेळ्यात अडकलेल्या लाखो भाविकांसाठी आपत्कालीन व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, महाकुंभात सर्वत्र भुकेले, तहानलेले, दुःखी आणि थकलेले यात्रेकरू दिसतात. त्यांनी राज्य सरकारला मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याचे आणि तातडीने व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. मात्र याठिकाणी सध्या गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, लखनौच्या बाजूने ३० किलोमीटर जाम आहे, तर रेवा रोडच्या बाजूने १६ किलोमीटर जाम आहे. वाराणसीपासून १२-१५ किलोमीटर अंतरावर आधीच वाहतूक कोंडी आहे. यामुळे मागेही जात येत नाही आणि पुढेही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थिती भयानक झाली आहे.
तसेच स्टेशनवर इतकी गर्दी आहे की लोक ट्रेनच्या इंजिनमध्येही घुसले. इतक्या मोठ्या गर्दीत लोकांना त्रास होत आहेच, पण शहरातील सामान्य जीवनावरही परिणाम होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात याठिकाणी जाताना परिस्थिती बघून अंदाज घेऊन जावं, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.