लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही?, फडणवीस सरकारमधील मंत्र्याने दिली महत्वाची माहिती..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
अनेक योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जनतेला पोहचल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घ्यायला हवा. लाडकी बहीण योजना सुरु आहे. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जाते.
परंतु माझी सर्व बहिणींना विनंती आहे की, लाडकी बहीण योजना बंद होणार होणार नाही, तुम्ही काळजी करु नका. वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. जे काही २१०० रुपये जाहीर केलेले ते योग्यवेळी आपल्याला देवेंद्रभाऊ देणार. आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे देवेंद्र भाऊ योग्य वेळी निर्णय घेतील. तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करतील, असं शिवेंद्रराजे यांनी सांगितले आहे