सोशल मीडियावर पत्नी म्हणून मुलीचा फोटो केला शेअर, मुलीने उचलले हे टोकाचे पाऊल…,पुण्यातील धक्कादायक घटना..

पुणे : एक १८ वर्षीय युवक एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. परंतु ती मुलगी त्याला काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे मुलीचे काही फोटो कडून सोशल मीडियावर ते स्वत:ची पत्नी असल्याचे सांगत फोटो शेअर केले. मुलीला प्रकार समजल्यावर तिला धक्का बसला आणि तिने धक्कादायक पाऊल उचलले.
मिळलेल्या माहिती नुसार, एक १८ वर्षीय युवक औंध भागात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा सतत पाठलाग करत होता. परंतु ती मुलगी त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. यामुळे त्याने त्या मुलीचे काही फोटो काढले. सोशल मीडियावर ते स्वत:ची पत्नी असल्याचे सांगत फोटो शेअर केले.
मुलीला हा प्रकार समजल्यावर तिला धक्का बसला. तिने स्वत:च्या घरात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या आईने पाहतच तिने धाव घेत तिला वाचवले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्या मुलासंदर्भात तक्रार दिली. यावरुन भादंवि 354 आणि 354-डी आणि पॉस्को एक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी त्या मुलाची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान त्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिला या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.