भाजपचा नवा अध्यक्ष कोण? याच आठवड्यात होणार घोषणा, महाराष्ट्राचा होणार अध्यक्ष? महत्वाची माहिती आली समोर..

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून भाजपच्या नव्या अध्यक्षपादासाठी प्रक्रिया ही सुरू आहे. संघटनात्मक नाव नोंदणीसह पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय. अशातच ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस असून त्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षाच्या स्थापना दिनापूर्वीच अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचं नवा जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तीन राज्यांमधील निवडणुकीतील विजयामुळे उत्साहित झालेल्या भाजपने आता जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारी म्हणून नवीन पक्षाध्यक्षाचा शोध नव्याने सुरू केला आहे. भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. परंतु जेपी नड्डा २०१९ पासून या पदावर आहेत. पण आता नवा अध्यक्ष नेमण्यात येण्याची चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी विनोद तावडे, धर्मेंद्र प्रधान, पुरंदरेश्वरी आणि भूपेंद्र यादव यांची नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे यावेळी महाराष्ट्राचा अध्यक्ष होणार का? हे देखील येणाऱ्या काळात समजणार आहे. तसेच संघाकडून ऐनवेळी कोणत्या नावाचा विचार केला जाणार का? हे देखील लवकरच समजेल.
६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस असून त्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रस्ताव समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे पक्ष नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल, असे सांगितले जात आहे.