बाईक टोइंग करताना मालकालाही धोकादायकरीत्या उचललं, पुण्यातील प्रकार, कर्मचाऱ्यांची दादागिरी….


पुणे : पुण्यात भरदुपारी बाराच्या सुमारास गुलटेकडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका दुचाकीस्वाराने गुलटेकडी येथे पदपथावर दुचाकी पार्क केली होती. यावेळी नो-पार्किंगमधील दुचाकी क्रेनद्वारे उचलून वर ठेवताना दुचाकीस्वारालाही तीन ते चार फुटांपर्यंत उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

यावेळी जागेवर दंड भरतो, गाडी उचलू नका अशी विनवणी करीत गाडी उचलण्यास अटकाव करणाऱ्या दुचाकीस्वाराचा हात क्रेनच्या पट्ट्यात अडकल्याने दुचाकीस्वार गाडीसोबत उचलला गेला. यात दुचाकीस्वाराच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. मात्र, मोठा अपघात होता होता राहिला. दुचाकी चालकाने ही घटना समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली आहे.

क्रेनवरील कर्मचाऱ्याने दुचाकीस्वाराचे काहीही न ऐकता दुचाकी उचलण्यास सुरुवात केली. दुचाकीस्वाराने त्यास विरोध केला असता, टोइंग करणारे कर्मचारी मनमानीपणे गाड्या उचलत होते. यामुळे त्यांची दादागिरी यावेळी समोर आली आहे. नंतर वाहतूक पोलिसांची क्रेन तेथे आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

पोलिस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून क्रेनवरील कर्मचाऱ्यांनी गाडी क्रेनपर्यंत ढकलत नेली. दुचाकीस्वाराला स्वत:ची चूक मान्य होती. त्यामुळे ते जागेवर दंड भरण्यास तयार होते. मात्र कर्मचारी ऐकत नव्हते. दुचाकीस्वाराने त्याबाबत क्रेनवरील कर्मचाऱ्यास सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वाराकडे लक्ष न देता त्यांनी गाडी उचलली.

यामुळे दुचाकीस्वार सुमारे तीन ते साडेतीन फुटांपर्यंत वर उचलला गेला. दुचाकीस्वाराने आरडाओरडा केल्यानंतर त्यांना खाली उतरवले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!