काय सांगता! चक्क पाणीपुरी विक्रेत्याला आली GST ची नोटीस, कमाई बघून अधिकारीची चक्रावले…

तामिळनाडू : तामिळनाडूतील एका पाणीपुरीवाल्याची कमाई सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या पाणीपुरी विक्रेत्याला जीएसटी विभागाने नोटीस धाडली आहे. कारण आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या पाणीपुरी विक्रेत्याने तब्बल ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. याचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे.
तसेच जीएसटी अधिनियमानुसार ज्या व्यवसायांची वार्षिक कमाई ४० लाखांहून अधिक असते त्यांना जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य असते. मिळालेल्या माहिती नुसार, , या पाणीपुरी विक्रेत्याला १७ डिसेंबर २०२४ रोजी तामिळनाडू जीएसटी कायदा आणि केंद्रीय जीएसटी कायद्यांतर्गत समन्स बजावण्यात आली होते.
अधिकाऱ्यांनी विक्रेत्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून गेल्या तीन वर्षांचे आर्थिक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या तपासाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने डिजिटल व्यवहारांद्वारे मिळणारे मोठे पेमेंट आहे.
दरम्यान, या घटनेनंतर इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पाणीपुरी विक्रेत्याची ४० लाख रुपये ही फक्त मिळालेली रक्कम आहे, निव्वळ नफा नाही. तसेच काही लोकांनी असाही अंदाज लावला की जर डिजिटल पेमेंटद्वारे या विक्रेत्याने ४० लाख रुपये असेल तर रोख पेमेंट देखील मोठ्या प्रमाणात असेल.