पुणे शहरात भाजपने काय केले, काँग्रेस पदाधिकारी म्हणतोय आम्ही काय करू शकतो! पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याचे पोस्टर चर्चेत..!!

पुणे : शिक्षणाचे माहेर घर मानले जाणाऱ्या पुण्यासारख्या शहरात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट वाढला आहे. पुण्यातील वाढते प्रदूषण, बेरोजगारांच्या वाढत्या संख्यांच्या समस्यांवर आता मात्र काँग्रेस हा उपाय आहे. सगळ्या समस्या संपवायच्या असतील, तर काँग्रेस हा एकमेव पर्याय जनतेसमोर आहे. अशा आशयाचे फलक पुणे शहरात चर्चेला आले आहेत.
पुणे शहरात काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पुण्यात वास्तव परिस्थितीवर बऱ्याच ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेले आहे. ‘प्रत्येक समस्येवर एकच उपाय तो म्हणजे काँग्रेस!’ या आशयाचे पोस्टर लावून काँग्रेसच्या काळात झालेल्या कार्याची माहिती या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
पोस्टरमध्ये , “पुण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहराला खासदार नाही, नेता नाही. वाहतुक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडगिरी वाढली आहे. ड्रग तस्करी आणि गुन्हेगारांना मिळालेली मोकळीक चिंतेचा विषय बनला आहे.
या सगळ्या समस्या सोडवण्यात भाजपला अपयश आले आहे. काँग्रेसच या सगळ्यावर उपाय देऊ शकतो. काँग्रेसने केलेल्या कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत.” असामजकूर या पोस्टर मध्ये टाकल्याने सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे.