काय सांगताय! १८ वर्षांची तरुणी, गुगलच्या मदतीने प्रेग्नंट झाली, कसं शक्य झालं?

नवी दिल्ली : गुगलचा वापर आपण सगळेच आपल्या जीवनात दररोज करत असतो. मात्र तुम्हाला आता आश्चर्य वाटेल एक १८ वर्षांची तरुणी चक्क गुगलच्या मदतीने प्रेग्नंट झाली आहे. एका महिलेने १८ व्या वर्षी गर्भवती राहण्याचा आणि मूल होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयात महिलेला गुगलने पाठिंबा दिला. आता हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या महिलेचं नाव काई स्लोबर्ट आहे. जेव्हा लोकांना हे ऐकले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. पण काईला त्याचा काही फरक पडला नाही.
‘माय एक्स्ट्राऑर्डिनरी फॅमिली’ या यूट्यूब चॅनल शोमध्ये महिलेने तिची कहाणी सांगितली, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काई म्हणते, “मी बेघर होते, तरीही मी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. मी इतर कोणालाही ही पद्धत अवलंबण्याचा सल्ला देणार नाही, पण मला मुले आवडतात. म्हणून मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.
बाळाचा जन्म कसा झाला? या प्रश्नावर काई हसते आणि म्हणते, मी गुगलवर ‘फ्री स्पर्म डोनर’ शोधले आणि एक सापडला अशाप्रकारे ती दोनदा गर्भवती राहिली. त्यांची पहिली मुलगी कॅडी आता ५ वर्षांची आहे आणि दुसरी मुलगी फेथ ३ वर्षांची आहे. त्याच वेळी, काई आणि डी यांचे लग्न होऊन ५ वर्षे झाली आहेत. काई कोणाशी लग्न करणार होती हे कोणालाही महत्त्वाचं नव्हतं, पण तिच्या पालकांना तिच्या गरोदरपणाची बातमी आवडली नाही.
काई म्हणाली की कॅडीला जन्म देण्यापूर्वी मी प्रेग्नेंसी शेल्टरमध्ये एकटीच राहिली कारण त्यावेळी डी माझ्यासोबत नव्हती. मुलीच्या जन्मानंतरही काई बेघर राहिली, पण काही महिन्यांनंतर, डी तिच्या आयुष्यात आली आणि ते दोघेही एकत्र एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. आता दोघे एकत्र आल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं आहे…