प्रेमासाठी कायपण!! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने चोरल्या १४ गाड्या अन्…

मुंबई : एका प्रेमवीराने त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी आणि शॉपिंग करून देण्यासाठी पैसे नसल्याने दोघांनी १-२ नव्हे तब्बल १४ बाईक्स चोरल्या. तर दुसरीकडे पत्नीच्या विरहामुळे दु:खी झालेल्या एकाने १५ बाईक्स पळवल्या.
सिडको पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या बाईक्सही जप्त केल्या आहेत. या अनोख्या बाईक चोरीमुळे शहरातील नागरिकांचं मात्र धाबं दणाणलं आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्य माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी २९ चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. पत्नी सोडून माहेरी गेलेल्या विरहात पती दु:खी झाला, आणि सिरपची नशा लागली. मात्र नशा करण्यासाठी पैसे नसल्याने एका आरोपीने चक्क १५ बाईक्स चोरल्या.
त्या पैशांचा गैरवापर तो करत होता. दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतलं. एवढंच नव्हे तर चोरी केलेल्या पंधरा दुचाकीदेखील त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. मोहम्मद हमीद अहमद सिद्दिकी असं या आरोपीचे नाव असून त्याने शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून या दुचाकी चोरल्या होत्या.
तर दुसरीकडे प्रेम विवाह करायचा आहे. मात्र प्रेयसीला भेटवस्तू आणि शॉपिंग करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकी चोरणाऱ्या २ प्रेमवीरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडून १४ दुचाकी जप्त केल्या. अजय विजय वाकडे आणि कैफ रफिक शेख अशी या दोघांची नावे आहेत.
हे दोघेही बिडकीन मधून दुचाकी चोरायचे आणि शहरात आणून अगदी स्वस्त भावात ५ ते ७ हजार रुपयात दुचाकीची विक्री करायचे अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिस आणि गुन्हे शाखा करत आहे.