Uruli Kanchan : उरुळी कांचनला किराणा दुकानात चोरी करणारे चोरटे निघाले पुरंदर तालुक्याचे! तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल …..


Uruli Kanchan  उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे दुकानातील गोडावुनमधून गायछाप तंबाखुचे पोते चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उरूळीकांचन गावचे हददीत सोलापुर पुणे हायवे रोडलगत असलेल्या विजय ट्रेडर्स होलसेल किराणा मालाच्या दुकान रविवार (ता.८) घडली आहे.

याप्रकणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विजय गुरुदास चावला (वय.४१, वर्षे व्यवसाय, किराणा दुकान रा. स्वरगधार सोसायटी ए 7 फ्लॅट नंबर 6 उरुळी कांचन ता. हवेली .जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, शेखर किसन जगताप (रा.निळूंज ता. पुरंदर जि.पुणे) निलेश महादेव बनकर (रा. खानवडी ता. पुरंदर जि. पुणे) सुरज शरद रणदिवे (रा. खानवडी ता. पुरंदर जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli Kanchan

मिळालेल्या माहिती नुसार, मौजे उरूळीकांचन गावचे हददीत सोलापुर पुणे हायवे रोडलगत असलेल्या विजय ट्रेडर्स होलसेल किराणा मालाच्या दुकानाचा छताचा पत्रा हा कशाच्या तरी साहयाने कापुन दुकानाच्या आतमध्ये प्रवेश करून दुकानातील गोडावुन मध्ये आले.

तसेच त्यानंतर गोडावुन असलेल्या किर्ती गोल्ड कंपनीचे १५ लीटर मापाचे तेलाचे ३८ डब्बे गोडावुन मधुन चोरी करण्याच्या उददेशाने आरोपींनी संगणमत करून जिन्याने वरती आले. त्यानंतर आठ हजार पाचशे रुपये किंमतीचे गायछाप तंबाखुचे पोते चोरून नेले आहे. याप्रकणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!