Uruli Kanchan : पालखी सोहळा अडथळा प्रकरणी उरुळी कांचन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, उरुळी कांचन पोलिसांची अखेर कारवाई…


Uruli Kanchan उरुळीकांचन :  जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील विसाव्यादरम्यान अडविण्याचा केलेल्या प्रकारावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर ग्रामस्थांवर कारवाई केली असून उरुळीकांचन पोलिस ठाण्यात बुधवार (ता.३) रोजी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान ग्रामस्थांनी पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त यांच्यात वादावादी घडून पालखी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जगदगुरूंचा पालखी सोहळ्यातील उरुळीकांचनचा विसावा रद्द करण्याची परिस्थिती उद्भवली आहे.

त्यानंतर पालखी सोहळा विश्वस्तांनी पालखी यवत मुक्कामी ठिकाणी आरती झाल्यानंतर निषेध सभा वारकऱ्यांच्या वतीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या सोहळ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Uruli Kanchan

गुन्हात सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाउसाहेब कांचन, अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पु कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन व इतर 15 ते 20 पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 126 (2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्ह्यात जिल्हाधिकारी आदेशाचे भंग करणे व सार्वजनिक व्यवस्थेचा भंग करण्याचा कलमांचा सहभाग आहे. त्यानुसार उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात काहींना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!