Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे एकाची आत्महत्या, किरकोळ वादातून उचलले टोकाचे पाऊल…

Uruli Kanchan : कुटुंबातील किरकोळ वादातून एका ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ परिसरात सोमवारी (ता.०९) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमरास घडली आहे.
राजु सोमनाथ जगताप (वय ५१ रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा विशाल राजु जगताप (वय.२१, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, राजू जगताप यांना दारू पिण्याचे व्यसन होते. दारूच्या नशेत विशाल यांची आई व वडील यांच्यात सोमवारी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावेळी राजू जगताप यांनी रागामध्ये घराचा दरवाजा आतून लावला होता. Uruli Kanchan
थोडया वेळाने विशाल घरी आला व त्याने खिडकीचे फटीतुन पाहीले असता वडिलांनी पत्र्याच्या लोखंडी ॲगलला साडीच्या साहयाने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजारी राहणारे करिम शेख, सुहास माने यांनी तात्काळ घराचा दरवाजा लाथा मारून उघडला व वडीलांचे गळयाचा गळफास सोडवुन एका खाजगी गाडीतून उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले.
दरम्यान, डॉक्टरांनी राजु जगताप यांना तपासुन उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार होले करीत आहेत.