पुण्यात महसूल अधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित..

पुणे : मुख्यमंत्री यांनी महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे 4 व 5 एप्रिल रोजी द ऑर्चिड हॉटेल, बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन 4 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता होणार असून 5 एप्रिल रोजी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. असे महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी पत्रान्वये कळविले आहे.
Views:
[jp_post_view]