टॉपलेस फोटोशूट, अंडरवर्ल्डशी कनेक्शन, आता ममता कुलकर्णी यांनी घेतला संन्यास, नेमकं कारण काय?


मुंबई : ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. किन्नर आखाड्यामध्ये त्यांना महामंडलेश्वर पद देण्यात आले. आध्यात्मिक जीवन स्वीकारण्यासाठी आणि महामंडलेश्वर बनण्यासाठी आधी दीक्षा घ्यावी लागते.

नुकत्याच भारतात परतलेली ममता प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी झाली होत्या. तिने केवळ कुंभमध्ये भाग घेतला नाही तर याच महाकुंभमध्ये आपल्या संन्यासाचादेखील निर्णय घेतला आहे. ममताने संन्यास घेतला असून तिने प्रयागराज महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली.

निवृत्तीनंतर या अभिनेत्रीला नवीन नावही मिळाले आहे. ममता कुलकर्णीचा पट्टाभिषेक सायंकाळी प्रयागात होणार आहे. यानंतर ममता कुलकर्णी यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. ममता कुलकर्णीने प्रयागराज महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली असून आता तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर ही पदवी देण्यात येणार आहे.

ममता कुलकर्णी यांनी १९९१ मध्ये ‘नानबरगल’ या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९९१ मध्येच त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘मेरा दिल तेरे लिए’ प्रदर्शित झाला. १९९३ मध्ये स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केल्यावर वादात सापडल्या होत्या. ड्रग्ज माफियाशी लग्न.. अंडरवर्ल्ड कनेक्शन अशा अनेकविविध गोष्टींमुळे ममता कुलकर्णी वादग्रस्त होत्या.

तसेच जेव्हा ममता यांनी चित्रपट इंडस्ट्री सोडली होती. तेव्हा त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आरोप होते. १९९३ मध्ये एका मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या.

दरम्यान, २०१३ मध्ये ममता कुलकर्णी यांनी हिंदी चित्रपट इंडस्ट्री सोडून ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी दुबईत लग्न केल्याचे म्हटले जात होते. विक्कीला दुबईमध्ये ड्रग्ज तस्करी करण्य़ासाठी १२ वर्षांचा तुरुंगवास झाला होता.

केनयातील एका हॉटेलमध्ये या तस्करीचा कट रचण्यात आला आणि मीटिंगसाठी ममता कुलकर्णी उपस्थितीत होत्या, असे दोषारोप पत्रात म्हटले होते. ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी आणि मनोज जैन या दोषींसोबत मीटिंगला हजर होत्या, असा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात नंतर बऱ्याच जणांना अटक झाली, तसेच एक किलो इफिड्रेन पावडर जप्त करण्यात आले होते. यामध्ये पुरवणी दोषारोप दाखल करून ममता कुलकर्णींनाही आरोपी बनवण्यात आले होते.

भारतात परतल्यानंतर ममताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला होता. मी २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे. २००० पासून मी भारताबाहेर राहतेय. हा संपूर्ण प्रवास खूपच भावूक होता आणि आता 2024 मध्ये मी पुन्हा मायदेशी परतली आहे. मला खूप आनंद होत आहे. हा आनंद मला शब्दांत मांडता येत नाहीये,” असं ती या व्हिडीओत म्हणाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!