टोमॅटो दिल्लीत १२० रुपये किलोवर, पाऊस लांबल्याचा परिणाम..


नवी दिल्ली : सध्या टोमॅटोबरोबरच काही भाज्यांचे दरही झपाट्याने वाढले आहेत. कडक उष्मा, कमी उत्पादन आणि उशीर झालेला पाऊस यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव आता १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ३ ते ५ रुपये किलो आणि किरकोळ बाजारात १० ते २० रुपये किलो होते. मात्र जूनमध्ये त्यात अचानक वाढ होऊन आता १०० रुपयांच्या वर झाले. लवकर पाऊस न पडल्याने हा परिणाम झाला आहे.

टोमॅटोचे भाव गेल्या आठवड्यात तिपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होत आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी तारांच्या आधारे झाडे उभारत आहेत. टोमॅटो घेण्यासाठी दिल्लीचे व्यापारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी बोलत आहेत.

महाराष्ट्रात देखील असेही जवळपास दर आहेत. भविष्यातही भाव चढेच राहतील, अशी शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पीक आल्यावर भाव खाली येण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!