आई स्वंयपाक करताना चिमुकला बादलीत बुडाला, १० महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू, नाशिक येथील घटनेने हळहळ…

नाशिक : १० महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधून ही धक्कादायक घटना ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
रोशन अजय तायडे असे १० महिन्यांच्या चिमुकल्याचं नाव आहे.
घटनेवेळी आई स्वंयपाक करत होती. बाळ बाजूलाच खेळत असल्याचं तिला वाटत होतं. काही वेळाने रोशन दिसेनासा झाल्यावर शोध घेतला असता तो बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळला. या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, चिमुकला आपल्या आईसोबत नाशिकरोडच्या रोकडोबावाडी परिसरात राहत होता. बुधवारी ८- ८:३०च्या सुमारास चिमुकला खेळत होता. त्याची आई स्वंयपाकघरात स्वंयपाक करत होती. काही वेळानंतर बाळाचा आवाज न आल्यावर तिने शोधाशोध केली. तेव्हा चिमुकला बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळला.
चिमुकल्याला बुडालेल्या अवस्थेत पाहुन आईने हंबरडा फोडला. बाळाला तात्काळ बिटको रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी असून, रोकडोबावाडी मशिदीजवळील रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.