चोरट्याने तब्बल ‘एवढ्या’ लाखांचे आयफोन केले लंपास; पुण्यातील वाघोली भागातील घटनेने खळबळ..


पुणे : चोरटयाने ६५ लाख रुपयांचे आय फोन १४, आय फोन १४ प्रो कंपनीच्या वेयर हाऊस फोडून पळवले आहेत. वाघोली भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वैभव झेंडे यांनी याप्रकरणी लोणी कंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी कंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी (ता. १५) रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादी हे वेअर हाऊस बंद करून निघून गेले. रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन कंपनीचे सिमा वेअर हाऊस मधील वरील सिमेंटचा पत्रा फोडुन त्यावाटे आत मध्ये प्रवेश केला.

तसेच ६५ लाख रुपये किमतीचे ॲपल कंपनीचे आयफोन १३, आयफोन १४ आयफोन १४ प्रो या मॉडेलचे वेगवेगळ्या रंगाचे एकूण १०५ मोबाईल सेट व ०१ मोबाईल चार्जंग ५ ॲडपटर केबल सह लंपास केले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी हाऊस उघडल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला आणि फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. लोणीकंद पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!