नानांवर गंभीर आरोप, वर्षांपूर्वीचा वाद गाजला; निधनानंतर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली…

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नाना पाटेकर यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आणि आठवणी कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील.
काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचं नाव एका मोठ्या वादामुळे चर्चेत आलं होतं. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर तनुश्री दत्ताने त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मात्र, तनुश्री दत्ताने आपल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नाही. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती लखनऊला एका कार्यक्रमासाठी जात असल्याचं सांगताना दिसत आहे.


तनुश्री दत्ता सोशल मीडियावर सक्रिय असून ती सातत्याने चाहत्यांसोबत विविध अपडेट्स शेअर करत असते. बुधवारी सकाळपासून तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक स्टोरी आणि सेल्फी व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये तिने एका महत्त्वाच्या बातमीचा उल्लेख केला आहे.
तनुश्री म्हणते, “मी बातमी पाहिली आहे, ऐकली आहे. आज माझ्या कामाचा दिवस आहे. एका इव्हेंटसाठी मी लखनऊला जात आहे. मला माझ्या इव्हेंटवर लक्ष केंद्रित करायचं आहे. जे काही घडलं, आज किती विचित्र दिवस आहे. कारण लखनऊमध्ये माझा खूप मोठा कार्यक्रम होणार आहे.”
पुढे ती म्हणते, “मी माझ्या संपूर्ण दिवसाचं नियोजन केलं होतं. मला अनेक लाइव्ह आणि कंटेंट पोस्ट करायचे होते. पण आता मला चिंता वाटते, कारण संध्याकाळी सर्व प्रसारमाध्यमांचं लक्ष केवळ ‘इव्हिल डेड’कडेच असेल. त्यामुळे नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची, हे ठरवल्यावरच मी माझी प्रतिक्रिया देईन. अर्थात, माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. पण…”
यानंतर तिचा व्हिडीओ अचानक कट होतो. त्यामुळे तनुश्री दत्ता नेमकी काय प्रतिक्रिया देणार होती, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. तिच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनावर तनुश्री दत्ता पुढे नेमकी काय भूमिका मांडते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
