थेऊर हादरलं!! किरकोळ कारणातून थेट गोळीबार, लोणीकंद पोलिसांनी केली तिघांना अटक, नेमकं घडलं काय?


थेऊर : किरकोळ वादातून तिघांनी त्यांच्याकडील परवाना नसलेल्या बंदुकीतुन गोळीबार केल्याची घटना थेऊर येथील जय मल्हार हॉटेलजवळ घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोपी थेऊर जय मल्हार हॉटेलच्या शेजारी येथे असलेल्या मोकळ्या प्लॉटवर कारमधून उतरुन उघड्यावर लघवी करत थांबले होते. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि सतीश उर्फ नाना मुंढे अशी आरोपींची नावे आहेत.

यावेळी त्यापैकी अजय मुंढे याने बंदुकीतून एक गोळी झाडली. त्यांना तेथील वॉचमन अक्षय साहेबराव चव्हाण याने ‘इथे लघवीला का थांबले, समोर माझी बायको आहे. तुम्हाला दिसत नही का?’ असे विचारले. यामुळे वॉचमन चव्हाण यांच्यासोबत आरोपींनी बाचाबाची करून त्याला हाताने मारहाण केली.

यावेळी त्याला दगडही फेकून मारला. तो दगड शितल चव्हाण यांना लागला. नंतर गाडीतून आलेल्या अजय मुंढेने हवेत गोळीबार करत तिथून पळ काढला. काही वेळात ही माहिती लोणीकंद पोलिसांना समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित गाडी व आरोपीला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे.

यावेळी महिलेला मार लागला. पोलिसांनी जखमी महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिली आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण  निर्माण झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!