निळ्या ड्रमची दहशदच वेगळी!! सौरभ हत्याकांड घडलं अन् लोकांचा ड्रमवरच अघोषित बहिष्कार, नेमकं घडलं काय?


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणी सौरभची बायको मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांना अटक करण्यात आली आहे. सौरभची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.

त्यानंतर त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये टाकला आणि वरून सिमेंट लावून तो ड्रम बंद करण्यात आला होता. नंतर हा ड्रम कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या ड्रमचा वापर करण्यात आल्याची बातमी देशभर पसरली आहे.

या घटनेनंतर निळ्या ड्रमचा उल्लेख सतत माध्यमांमध्ये होऊ लागला आहे आणि त्याची विक्री थांबली आहे. हत्येची बातमी समोर येताच मेरठमधील ड्रम विक्रेत्यांच्या दुकाणात शंभर टक्के शांती पसरली आहे. ग्राहक निळ्या ड्रमकडे अजिबात आकर्षित होत नाहीत.

दरम्यान, ड्रम विक्रेते या वर्तमनुसार ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तरीही त्यांना याचा लाभ मिळत नाही. दुकानदारांचा असा ठाम विश्वास आहे की,ड्रमला कोणताही दोष नाही, त्याचा वापर पाणी आणि धान्य ठेवण्यासाठी होतो. त्यांना आता त्यांच्या विक्रीसाठी ग्राहकांची ओळख (आयडी) पाहूनच ड्रम विकावा लागणार आहे.

सोशल मीडियातून जोक व्हायरल..

सोशल मीडियावर या निळ्या ड्रमची थट्टा सुरु झाली आहे, ज्यामुळे त्याचे आणखी वाईट चित्र तयार झाले आहे. ‘निळा ड्रम घरी न्या, किंवा फुकट घ्या’ असं जोक्स व्हायरल होत आहेत. निळ्या ड्रमची छाया समाजात अशी पसरली आहे की, लोक त्यास एक खतरनाक वस्तू म्हणून पाहत आहेत. या घटनेने ड्रम विक्रेत्यांना मात्र मोठं आर्थिक संकट उभे केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!