पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाच्या मार्गामध्ये पुन्हा बदल, अजित पवारांचा निर्णय पुणेकरांसाठी फायद्याचा ठरणार…


पुणे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि पाणीटंचाईसारख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अखेर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने विचार झाला असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत.

पुणे-शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला ५६ किमी लांबीचा दुमजली उड्डाणपूल वाघोली येथून सुरू होणार होता. मात्र अजित पवार यांच्या आदेशानुसार हा पूल आता विमाननगरमधील फिनिक्स मॉलपासून सुरू करण्यात येणार आहे.

यामुळे विमाननगर, खराडी, वडगाव शेरी या वाहतूकदृष्ट्या अति बोझ पडलेल्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. फिनिक्स मॉलपासून सुरू झाल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच वेळेचीही बचत होणार आहे.

तसेच पुणे-नगर रस्त्यावरील सोमनाथनगर चौक ते खराडी बायपास चौक दरम्यान धोकादायक बीआरटी मार्गिका अपघातांना कारणीभूत ठरत होती. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या मागणीवरून अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना ही मार्गिका तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वडगाव शेरी, गणेशनगर, खराडी, विमाननगरसारख्या भागांतील पाणीटंचाई हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न होता. यावर अजित पवार यांनी स्पष्ट सूचना देत महापालिकेच्या टँकर सेवेला अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना पुरवले जाणारे टँकर हे विनाशुल्क असतील, हे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी टँकरवाल्यांच्या मनमानी दरांवर आळा बसेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!