जन्मदाता बापच निघाला हैवान! १३ वर्षीय लेकीवर ४ महिने वारंवार बलात्कार, घटनेने राज्य हादरले…

सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. अशातच आता बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
आपल्या १३ वर्षीय लेकीवर बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी परिसरातील एका गावात घडली आहे.
जत पूर्व भागातील एका गावात १३ वर्षीय पोटच्या मुलीवर बापानेच लैंगिक अत्यार केला आहे. असहाय्यतेचा गैरफायदा घेत बापाने मुलीवर अतिप्रसंग केला. नराधम बाप मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत बोता. याची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाली. आईनं बापाला असे कृत्य करण्यास रोखले.
दरम्यान, वारंवार सांगूनही नराधम बाप काही ऐकत नव्हता. अखेर पीडित मुलीच्या आईने उमदी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेने मुलीसोबत घडलेल्या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह आईचा जबाब नोंदवला. तसेच आरोपी बापाला अटक केली.