अबब…अकरा कोटीचा घोडा बारामतीत, हैदराबादच्या नवाबाच्या सोनेरी घोड्याची एकच चर्चा..

बारामतीत : बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे. ती म्हणजेच हैदराबादच्या नवाबांनी तब्बल ११ कोटी रुपये किमतीचा सोनेरी रंगाचा घोडा आणल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली आहे. या घोड्याचे वैशिष्ट्य त्याचा चमकदार सोनेरी रंग, त्याची अभिजात रचना आणि अप्रतिम देखावा आहे.
बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये हैदराबाद येथील नवाबाने तब्बल ११ कोटीचा घोडा आणला आहे. या घोड्याचा रंग सोनेरी असून या घोड्याला पाहण्यासाठी कृषी प्रदूषणामध्ये एकच गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा घोडा विशेष प्रजातीचा असून, त्याला देशभरात उत्कृष्ट घोड्यांपैकी एक मानले जाते.
प्रदर्शनात या घोड्याचे दर्शन घेण्यासाठी प्रेक्षकांची रीघ लागलेली आहे. कृषी प्रदर्शनातील हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, या घोड्याने संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी असा दुर्मिळ अनुभव असतो, ज्यामुळे हा घोडा चर्चेचा विषय बनला आहे.
घोड्याची किंमत तब्बल ११ कोटी..
मालेगावच्या घोडेबाजारामध्ये या घोड्याची किंमत तब्बल ११ कोटी ठरविण्यात आल्याचे बोलले जाते. देशातील हा एकमेव घोडा असल्याचेही सांगण्यात आले आहे.मारवाडी जातीचा हा घोडा असल्याचे सांगण्यात आले आहे याचबरोबर अशा प्रकारचे घोडे भारतामध्ये फार पाहायला मिळत नाहीत. यामुळे हा घोडा चर्चेचा विषय बनला आहे.