काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावरील खटल्याची आता ‘समन्स ट्रायल’ सुनावणी होणार! नेमकं प्रकरण काय?

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. या खटल्याची ‘समन्स ट्रायल’ सुनावणी घेण्यास पुणे येथील एम.पी. एम.एल.ए. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी राहुल गांधी यांना परवानगी दिली आहे.
याबाबत पुढील सुनावणी येत्या २५ एप्रिल रोजी होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये राहूल गांधी यांनी भाषण केले होते. या भाषणात गांधी म्हणाले सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवलेले आहे की आम्ही मित्र एकदा जात होतो, तेव्हा काही लोक एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करीत होते, ते बघून खूप आनंद वाटत होता.
असे म्हणाले असेल तरी सावरकरांनी असे कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेले नाही, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली. यामुळे बदनामीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधी यांचे वकील म्हणून मिलिंद दत्तात्रेय पवार यांनी काम बघितले.
राहुल गांधी यांच्यावतीने त्यांनी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी, असा अर्ज सोमवारी न्यायालयात दाखल केला होता. या बदनामीच्या खटल्याची सुनावणी सोमवारी (दि. ७ एप्रिल) पुणे येथील विशेष न्यायालयात पार पडली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.