महापुरुषांचे फोटो काढून कॅबीनमध्ये स्वामी समर्थांचा फोटो, इंदापूरच्या गट विकास अधिकाऱ्यांचा कारणामा!! बसपाचे अजित ठोकळे यांच्याकडून तोंडाला काळे फसण्याचा इशारा…

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पंचायत समितीमध्ये सचिन खुडे हे गट विकास अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या ऑफिसमधील महापुरुषांचे फोटो होते, ते काढून टाकण्यात आले आहेत.
याठिकाणी त्यांनी देवाचा फोटो स्वामी समर्थ यांचा फोटो लावला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश सचिव बसपा अजित ठोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला आहे.
याबाबत ते म्हणाले, देवाचे फोटो लावा पण महापुरुषांचे फोटो काढून अस करणे योग्य नाही, आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जातीच्या लोकांना समानतेचा अधिकार दिला. सचिन खुडे हे मातंग समाजाचे असून सुद्धा त्यांना महापुरुषांच्या बाबतीत द्वेष निर्माण होत असेल तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.
ज्यांनी आरक्षण दिलं, त्यांच्यामुळे हे त्या खुर्चीवर बसत आहेत, त्यांच्याच अपमान करत त्यांचे फोटो बाहेर काढले याचा इंदापूर तालुक्यातील तमाम जनता जाहीर निषेध करत आहे. त्यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी आंदोलन करणार आहे.
अशा अधिकाऱ्याची इथून पुढे कोणतीही गय केली जाणार नाही. त्यांनी त्वरित महापुरुषांचे फोटो तेथे लावले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे. असा इशारा अजित ठोकळे यांनी दिला आहे.