महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं मोठे विधान, म्हणाल्या, ‘या निवडणुका…

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे मित्रपक्षांमध्ये सध्या अस्वस्थता दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे. राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय? यावर भाष्य करत आहेत. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत आपलं रोखठोक मत मांडलं आहे.
महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्यांना न्याय मिळायलाच हवा”, अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या की, महापालिकेच्या निवडणुका सर्व एकत्र असतानाही आम्ही वेगवेगळ्याच लढत होतो. मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतोत. त्यात नवीन काय आहे? महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात.
सर्व निवडणुका जर सर्वजण आपआपल्या सोईने लढवायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का? मग त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही ची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळायला हवा, असं सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत.