बारामतीत अजित पवार यांना ठरणार खरी श्रध्दांजली; सुनेत्रा पवार देशात विक्रमी विजयाच्या वाटेवर…


बारामती : राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट आघाडी घेतली असून, ही लढत एकतर्फी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असल्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या पहिल्याच फेऱ्यांपासून आघाडी घेतल्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मतमोजणी सुरू होताच पोस्टल बॅलेट्समध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीमध्येही ही आघाडी कायम राहिली. राजकीय तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या ट्रेंडनुसार निकालात फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेससह अनेक प्रमुख विरोधी पक्षांनी उमेदवार न दिल्यामुळे लढत जवळपास एकतर्फी झाली. याचा थेट फायदा सुनेत्रा पवार यांना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत “किती मतांनी विजय?” हा एकमेव प्रश्न उरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!