कोरोना लसीमुळे तरुणांचे अचानक मृत्यू? ICMR, एम्सचं संशोधन, आता खरी माहिती आली समोर..


नवी दिल्ली : कोरोना महासाथीनंतर अनेक जणांचा चालता-फिरता, अचानक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. दरदिवशी अनेकांचे असे अचानक मृत्यू होत असल्याचे नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोरोनाच्या महासाथीनंतर देशात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर अनेकांना याचा त्रास झाल्याचे सांगितले जात आहे.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशात गेल्या तीन ते चार वर्षात हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, कोरोना लस आणि हृदयविकाराने होणारे मृत्यू याचा काही संबंध नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या संशोधनाचा अहवाल मिळाला आहे. या मृत्यूंचा आणि कोरोना लसींचा संबंध नाहीय असं केंद्र सरकारने सांगितल आहे. भारतात कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी ठरली. गंभीर दुष्परिणामाची प्रकरणं दुर्मीळ आहेत. अचानक कार्डियाक अरेस्टच्या मृत्यूची वेगळी कारणं असू शकतात.

याबाबत आयसीएमआरने १८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या अचानक मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अभ्यास केला होता. यात जनुकिय दोष, जीवनशैली, आधीपासून असलेल्या व्याधी आणि कोरोना नंतर उद्भवलेला त्रास हे कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये काही अफवा देखील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कार्डियाक अरेस्टच्या मृत्यूची कारणं वेगवेगळी असू शकतात. कोरोना लस आणि अचानक मृत्यू यांचा संबंध जोडणं हे चुकीचं आणि संभ्रम निर्माण करणारं आहे. वैज्ञानिकांनी याचं समर्थन केलेलं नाही असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटल आहे. यामुळे आता याबाबत कोणीही मनात शंका आणू नये असे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!