नवरा पुण्यात कामाला; बायकोचे अल्पवयीन पुतण्याशी सूत जुळले, पती अचानक घरी आला अन् घडला भयंकर प्रकार


पुणे : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुण्यात कामासाठी आलेल्या पतीच्या अनुपस्थितीत पत्नीचे तिच्याच १७ वर्षीय नातेवाईकाशी संबंध निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील भोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये रमेश (नाव बदललेले) यांचे पुजाशी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही काळातच रमेश कामानिमित्त पुण्यात आला होता. या काळात पत्नी पुजा आणि तिच्या १७ वर्षीय नातेवाईकामध्ये जवळीक वाढल्याचे समोर आले.

गेल्या काही महिन्यांपासून हे संबंध सुरू असल्याची माहिती आहे. कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर घरात वाद निर्माण झाला. परिस्थिती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी रमेशला तातडीने गावी बोलावले.

१६ एप्रिल रोजी रमेश गावी परतल्यानंतर घरातील तणाव अधिक वाढला. या घटनाक्रमामुळे संबंधित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीयांनी त्याला वाचवले. त्यानंतर पत्नीनेही विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!