शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बळीराजाला गुरुवारपर्यंत मिळणार 5 हजार रुपये, राज्य सरकारचे तातडीचे आदेश

मुंबई : सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडला असून बळीराजा चिंतेत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या आधीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचंही सरकारने जाहीर केलं होतं. यामुळे गुरुवारपर्यंत ही रक्कम दिली जाणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मदत कधी द्यायची यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे १.५० कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच या तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी उपाय योजना करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले होते. राज्यातील 1.50 कोटी शेतकऱ्यांना 5000 रुपये दुष्काळी मदत देण्यात येणार आहे. ही अग्रिम मदत असणार आहे. त्यानंतरही सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.


दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या आधीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचंही सरकारने जाहीर केलं होतं. त्यामुळे या 5 हजार रुपयांच्या मदतीकडे बळीराजाचं लक्ष लागलं होतं. अखेर याबाबत सरकारने आज निर्णय घेतला आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मदत कधी द्यायची यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट 7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ आता त्यावरील वीजपंपांनाही सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
