Solapur Accident : एकाच गाडीवर तिघे जिवलग मित्र निघाले, भरधाव दुचाकी झाडावर आदळली अन् क्षणात सगळं संपलं, तिघांचा जागीच मृत्यू….


Solapur Accident : राज्यात सध्या अपघातांच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. सोलापूर महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

इरण्णा मठपती (वय.२४), निखिल कोळी (वय.२४) दिग्विजय (आतिश) सोमवंशी (वय.२१) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, जुळे सोलापूर भागात राहणारे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या पल्सर गाडीवरुन घरी जात होते. यावेळी शहरातील महावीर चौकात त्यांची गाडी झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की तिघेही मित्र गाडीवरुन लांब उडून पडले. Solapur Accident

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही तरुणांना तात्काळ रुग्णालयात हलवलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील तीन तरुण दगावल्यानं संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!