धक्कादायक! डबे पोहोचवणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हवालदाराचा कारनामा..

उरुळी कांचन: पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत उरुळी कांचन येथील जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या एका महिलेकदे शरिरसुखाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा दावा केला आहे.
यासंदर्भात एक व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रकारामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. गणैश रतन दाभाडे (बिल्ला क्र. ३२१) असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दाभाडे हा मेसचे डबे पोचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता. महिलेने विरोध करताच त्याने आपला पवित्रा बदलला. संबंधित पोलीस स्टेशन महिलेची तक्रारही लिहून घेत नाही, असा आरोपही शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, यासंर्भात उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले की, संबंधित महिलेची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.