हिंजवाडीतील चार कामगारांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण अखेर समोर!! चालकच ठरला खुनी, नेमकं केलं काय?


पिंपरी चिंचवड : येथील हिंजवडीमध्ये काल मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. या घटनेत स्वत: चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे.

यामध्ये जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये एकूण 12 कामगार होते. याबाबत माहिती अशी की, फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. आग मोठी होण्याआधी तो गाडीतून उतरला होता.

चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणले. तिघांशी वाद होता त्यांना मारायचे म्हणून त्याने हा प्रकार केला. घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तपासात याबाबत उलगडा झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!