चहल आणि धनश्रीच्या घटस्फोट याचिकेत धक्कादायक माहिती, दोघेही तीन वर्षांपासून….


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच काल (ता.२०) रोजी घटस्फोट झाला आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयात काल युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर सुनावणी झाली.

यावेळी युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघंही वांद्रे कुटुंब न्यायालयात दाखल झाले होते. या सुनावणीत युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे.

चहलचे वकील नितीन गुप्ता म्हणाले की, चहल आणि धनश्री वर्मा यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या संयुक्त याचिकेवर कौटुंबिक न्यायालयाने डिक्री मंजूर केली आहे. न्यायालयाने नमूद केलं की, दोघांनी संमतीच्या अटींचं पालन केलं आहे.

परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी चहल आणि वर्मा यांनी दाखल केलेली संयुक्त याचिका कुटुंब न्यायालयाने स्वीकारली आहे, असं गुप्ता म्हणाले. चहल आणि वर्मा यांचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. त्यांच्या याचिकेनुसार, ते जून २०२२ मध्ये वेगळे झाले.

दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट मिळावा यासाठी कुटुंब न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली. चहल आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत भाग घेत असल्याने तो नंतर उपलब्ध होणार नाही हे लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कुटुंब न्यायालयाला गुरुवारपर्यंत घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याची विनंती केली होती.

२२ मार्चपासून आयपीएल टी-20 स्पर्धा सुरु होत आहे. चहल पंजाब किंग्स इलेव्हन संघाचा भाग आहे. हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक जोडप्यासाठी निश्चित केलेला सहा महिन्यांचा कूलिंग पीरियड बुधवारी हायकोर्टाने माफ केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!