बारामतीत धक्कादायक घटना! पंधरा वर्षीय विद्यार्थीनीवर दोन वर्षे बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल…


बारामती : जबरदस्ती करत दहावीच्या वर्गात शिकत असताना मैत्री करून वेगवेगळ्या लॉजवर नेऊन दोन वर्षे जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरीरसंबंध ठेवून आक्षेपार्ह फोटो आईवडीलांना पाठवल्याचा प्रकार याठिकाणी उघडकीस आला आहे.

याबाबत सोमेश्वर नजीकच्या करंजे येथील पृथ्वीराज प्रताप गायकवाड याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही विद्यार्थिनी करंजेपूल परिसरातील एका शाळेमध्ये दहावी इयत्तेत शिकत असताना आरोपी हा शाळेत आला. तसेच जबरदस्तीने मैत्री देखील केली. नंतर मुलगी क्लासला जात असताना विश्वराज प्रताप गायकवाड याने पिडीत मुलीला, तू मला खुप आवडते. माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे असे म्हणुन प्रपोज केलं.‌

याला मुलीने नकार दिला. नंतर जबरदस्ती कंरजेपुल येथे आरोपीने स्कूटी मोटार सायकलवर येऊन जबरस्तीने कॉफी पिण्यासाठी जबरस्तीने स्कुटी मोटार सायकलवर बसवून निरा लोणंद रोड लगत असलेल्या एका लॉजवर नेले. याठिकाणी तिच्यासोबत शरीरसंबध केले व त्यानंतर सदर प्रकर कोणास सांगू नको अशी धमकी दिली.

यानंतर अनेकदा तिला लॉजवर नेऊन संबंध ठेवले. तसेच लॉजवर जबरस्तीने नेऊन मी तुझे नकळत काढलेले न्युड फोटो वायरल करणार अशी धमकी दिली, त्यानंतर मुलीच्या आईच्या मोबाईलवर दोघांची त्याच्या मोबाईलमध्ये काढलेली सेल्फी फोटो पाठविले. यामुळे मोठी खळबळ उडाली.

नंतर मुलीच्या काँलेजच्या गँदरिंगच्या वेळी त्याने जबदस्तीने हातात ओढून त्याचेसोबत त्याचे मोबाईलमध्ये एकत्रित फोटो काढले. ती लातूरला शिक्षण घेण्यासाठी गेली असता तिला फोन करून त्रास दिला, याबाबत सध्या बारामती पोलीस तपास करत आहेत. या घटनेने मात्र सोमेश्वर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!