पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक कारणामा, मोबाईलच्या कॅमेऱ्यातून बघायला भक्तांचे खाजगी क्षण, पोलिसांनी केली अटक…

पुणे : पुण्यात एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदूबाबाचं नाव आहे. तो स्वतःकडे ‘दिव्यशक्ती’ असल्याचा दावा करत अनेकांशी फसवणूक करत होता. याबाबत तपास केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा बाबा हिडन मोबाईल अॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करत होता. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. यामुळे पोलीस त्याला अटक केली आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अँपची कसून चौकशी करण्यात आली आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. हे चित्रीकरण कुठे बाहेर दिले जात होते का? याचा देखील तपास केला जात आहे.
या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
तसेच बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या बाबाने मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले.
तसेच फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने या बाबाच्या भक्तांना एकच धक्का बसला असून प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अनेकांची चौकशी सध्या सुरू आहे.