चित्रपटसृष्टीत खळबळ! अभिनेत्रीच्या मुलाने ५७व्या मजल्यावरुन संपवलं आयुष्य, नेमकं कारण काय?

मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरात सिनेसृष्टीला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका स्टार अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. . संबंधित अभिनेत्रीच्या मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
एका प्रसिद्ध गुजराती टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाने ५७व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना इतकी गंभीर होती की काही क्षणात परिसरात खळबळ माजली.
सी ब्रुक या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ही घटना असून, आत्महत्या केलेला मुलगा त्या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. ही घटना बुधवार, २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मुलगा शिक्षणासाठी ट्युशनला जाण्यास नाखूष होता.
आईने ट्युशनसाठी आग्रह केला आणि त्यावरून आई–मुलामध्ये वाद झाला. या वादात संतप्त झालेल्या मुलाने ५७व्या मजल्यावरून खाली उडी मारली. उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, आता संबंधित अभिनेत्री कोण आहे? मुलाचं नाव काय? याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नाहीये. तपासाबाबत पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत. ज्या अभिनेत्रीच्या मुलानं आत्महत्या केलीय, ती अभिनेत्री गुजराती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.