शिवराज राक्षे खरंच चीतपट झाला? चौकशी होणारच! महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, ५ जणांची समिती..

पुणे : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम लढत झाली. मात्र, या लढतीत चितपट नियमान्वये पृथ्वीराज मोहोळला बाद देत पैलवान पृ्थ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले आहे.

पण, पंचाच्या या निर्णयावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं विचारणा केली, त्यावेळी राग अनावर झाल्याने त्याने थेट पंचाची कॉलर पकडून लाथ मारली. शिवराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला. त्यामुळे, महाराष्ट्रभर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर शंका उपस्थित करत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघावरही प्रश्न उपस्थित केले होते.
त्यामुळे, या संघटनेची व महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेची देकील मोठी बदनामी झाले आहे. तर, काहींनी ही कुस्ती पुन्हा घेण्याची मागणीही केली होती. अखेर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर या निर्णयावर शिवराज राक्षेनं आक्षेप घेतला आणि राग अनावर झाल्याने थेट पंचाची कॉलर पकडून लाथ मारली. या लढतीवर अनेकांना प्रतिक्रिया दिल्या अनेक प्रश्न उपस्थित केले. पुन्हा कुस्ती घेण्याची मागणी देखील करण्यात आली.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत मोठा निर्णय घेत अंतिम लढतीत पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. २८ फेब्रुवारीपर्यंत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या अंतिम लढतीसंदर्भात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.