Sharad Pawar : पुणे जिल्ह्यानंतर आता शरद पवारांनी नगर जिल्ह्या हेरला! मोठा डाव टाकत ८ जागांवर केला दावा…

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आता शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत देखील चांगले यश मिळणार अशी आशा आहे.
शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मध्ये मोठे यश मिळवले आहे. यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर कडे विशेष लक्ष आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघाकडे पवार यांचे लक्ष असून जिल्ह्यातील आठ मतदारसंघात शरद पवार यांचे म्होरके खिंड लढवणार आहेत. Sharad Pawar
दरम्यान, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने नगर जिल्ह्यातील आठ जागांवर दावा ठोकला आहे. पक्षाचे नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाने जिल्ह्यातील आठ जागांवर दावा सांगितला आहे.
तसेच, जे लोक पक्षाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत त्या लोकांची सोमवारी मुलाखत घेतली जाईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. ही मुलाखत पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.