Shahapur News : मोठी बातमी! कसारा घाटाच्या पायथ्याला सापडले दोन कोटी रुपये, रक्कम नेमकं कोणाची?

Shahapur News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहन तपासणी केली जात आहे. त्यानुसार मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ करण्यात आलेल्या तपासणीत कारमध्ये लाखोंचे घबाड आढळून आले आहे.
अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलिस चौकी जवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करत असताना ( MH 11 BV 9708) या वाहनात रोख रक्कम आढळून आली आहे. Shahapur News
अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. सदर वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव व निवडणूक भरारी पथका कडून पुढील तपास सुरु आहे.