ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा..


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली. यंदाचा हा पुरस्कार ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांना दिला आहे. १०० वर्षीय राम सुतार हे मागील जवळपास सात दशकांपासून शिल्पकार म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक ऐतिहासिक पुतळे आणि मूर्ती उभारल्या आहेत. त्यांच्या या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण २०२४ हा जाहीर करण्यात आला आहे. राम सुतार यांचे वय १०० वर्ष आहे. त्यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजही ते शिल्प साकारतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली.

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत.

कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला.

१९५२ मध्ये त्यांचे प्रमिलाशी लग्न झाले आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार (१९५७ मध्ये जन्म) देखील एक शिल्पकार आहे आणि त्याने त्यांच्या वडिलांसोबत पुतळ्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला भारतातील रॉकेट प्रक्षेपण स्थळावर एक मूर्ती बनवायची आहे, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!