वयाने ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत रोमान्स करण्याबद्दल सलमान म्हणाला, तिच्या मुलीसोबतही…


मुंबई : बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. रविवारी मुंबई या ट्रेलर लाँचचा भव्य कार्यक्रम पार पडला.

सिकंदर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिंकदर या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सलमानचा हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात सलमानसोबत पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. या दोघांच्या वयात बरंच अंतर आहे. एकीकडे सलमान ५९ वर्षांचा आहे तर रश्मिका २८ वर्षांची आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सलमानला याविषयी आवर्जून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमानने त्याच्याच ‘दबंग’ अंदाजात उत्तर दिलं. रश्मिका काय तर भविष्यात तिच्या मुलीसोबतही काम करणार, असं तो म्हणाला.

रश्मिकासोबत काम करण्याबद्दल सलमान पुढे म्हणाला, जर हिरोइनला काही समस्या नाही तर मग तुम्हाला का समस्या आहे? तिचं लग्न होईल, तिला मुलगी झाली की तिच्यासोबतही काम करेन. आईची परवानगी तर मिळेलच ना? यावेळी सलमानने रश्मिकाच्या कामाचं तोंडभरून कौतुक केले आहे.

“एकाच वेळी ती ‘पुष्पा २ आणि ‘सिकंदर’ या दोन मोठ्या चित्रपटांसाठी शूटिंग करत होती. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ती ‘पुष्पा २ चं शूटिंग करायची. त्यानंतर ती ‘सिकंदर’च्या सेटवर रात्री ९ वाजता यायची आणि आमच्यासोबत पहाटे ६.३०पर्यंत शूटिंग करायची. असं तिचं शेड्युल होतं. पायाला दुखापत झाल्यानंतरही तिने एकाही दिवसाचं शूटिंग रद्द केलं नव्हतं. कामाप्रती तिची निष्ठा पाहून मला माझ्या तरुणपणाची आठवण झाली, असं सलमान म्हणाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!