सोरतापवाडीत प्रवासी रिक्षाला कारने ठोकरले ! एक स्थानिक ठार अन्य चौघे जखमी…!


 

उरुळी कांचन : प्रवासी रिक्षाला भरधाव चारचाकी कारने पाठिमागून ठोकरल्याने रिक्षाचा चक्काचूर होऊन १ जण स्थानिक जागीच ठार तर अन्य २ गंभीर तर २ दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

भानुदास गोरे (वय ५८, रा.सोरतापवाडी ता.हवेली, जि.पुणे ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्याचे नाव आहेत. तर
सुनिता काळुराम जगताप , इंदु जगताप (रा. दोघेही बेलसर, ता.पुरंदर , जि. पुणे ) , विष्णू राजाराम अंधारे , छाया विष्णू अंधारे (दोघेही रा. सोरतापवाडी, ता.हवेली, जि.पुणे ) असे अपघात जखमी झालेल्या प्रवाश्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून हडपसरहून प्रवासी वाहतुक करणारा रिक्षा  उरुळी कांचनच्या दिशेने प्रवासी घेऊन निघाला होता. ( रिक्षा एम.एच १२ आर.पी.५६८०) हा  सोरतापवाडी हद्दीत आला असता पाठिमागून कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार बसली की, रिक्षा जागीच पलटी होऊन प्रवासी भानुदास गोरे यांना जोरदार मार बसून जागीच ठार झाले. तर उर्वरित चौघा प्रवाश्यांना जखमी अवस्थेत उरुळी कांचन येथील खाजगी दावाखान्यात दाखल केले. या अपघाताचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलिस करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!