ट्रोलिंगवरुन राज ठाकरेंनी राजकीय पक्षांना झापले, म्हणाले, ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी…


पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सतत चर्चेत असतात. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. याठिकाणी पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले. ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांच्या सद्य स्थितीवर मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळली आहेत. मार्मिक ते आज पर्यंतची पत्रकारिता मी स्वत: पाहत आलो आहे. व्यंगचित्रकार आणि पत्रकार हे एकच आहेत. मी राजकारण आणि पत्रकारिता दोन्ही पाहात आलोय.

त्यामुळे आज पत्रकारांवर होणारे हल्ले हे नक्कीच निषेधार्ह आहे. पण ट्रोल वगैरे करणे, मुळात हे तुम्ही वाचताच कशाला. एकादा माझा कार्यक्रम, बोलणं संपलं की मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही.

मग तुम्ही कशाला पाहता, हे मोबाईल म्हणजे रिकाम्यांचा धंदा. घरी आलं की बोट आपटत बसायचं, राजकारण्यांनी तर यासाठी विशेष लोक पाळलेली आहेत. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देणं बंद करावं.

ज्यांना ज्ञान नाही, त्यांना कशाला गांभीर्याने घ्यायचं, अशा शब्दात ट्रोलिंगच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज्यात पत्रकारिता अजुनही जिवंत आहे. असे असले तरी अनेकांना घरी बसून काही कामे नसते. मागचा पुढचा इतिहास माहिती नसतो. काही लोकं राजकीय पक्षांनी पाळलेली असतात.

त्यांना लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा त्रास करुन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, ते लिहिण्याची सध्या गरज आहे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!