Raj Thackeray : आता अजित पवारांसाठी राज ठाकरे मैदान गाजवणार, बारामतीत होणार भव्य सभा, सुनेत्रा पवार यांचा करणार प्रचार….


Raj Thackeray : बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबियांमध्ये लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढत रंगणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहे.

त्यांना आता घरातूनच आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. सुळे यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासोबत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अन् मनसेसुद्धा आहे. आता स्वत: राज ठाकरे सुनेत्रा पवार यांच्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतली आणि पुढील रणनीती बाबत चर्चा केली. बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे तालुकास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. तसेच राज ठाकरे यांची सभा ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी होणार आहे. या सभेची वेळ आणि ठिकाण ठरलेलं नाही. लवकरच ठिकाण ठरवलं जाईल. अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिली. Raj Thackeray

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणूक लढवण्यासाठी ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला छाननी झाली. त्यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले.

तर ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत.या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!