पुणेकरांनो मेट्रोत बसण्याआधी आता शोधा त्या ‘विशेष’ खुणा, प्रत्येक गाडीत महिलांसाठी असेल खास राखीव जागा…


पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ८ मार्चपासून पुणे मेट्रोच्या सर्व गाड्यांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक गाडीत तीन डबे असतात आणि ही नवीन आसन व्यवस्था तिन्ही डब्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. पुणे मेट्रोने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

पहिला डबा: महिलांसाठी १४ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २ जागा. मधला डबा: महिलांसाठी १८ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ जागा. तिसरा डबा: महिलांसाठी १४ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २ जागा. यामुळे आता प्रत्येक मेट्रो गाडीमध्ये महिलांसाठी एकूण ४६ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ जागा राखीव राहणार आहेत.

प्रवाशांना महत्वाच्या सूचना…

मेट्रो प्रशासनाने या नवीन आसन व्यवस्थेचा तपशीलवार आराखडा सर्व स्थानकांवर आणि अधिकृत ॲपवर उपलब्ध करून दिला आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये ठळक चिन्हे लावण्यात आली असून, प्रवाशांना या राखीव जागा ओळखण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!