पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना एकदा डोकं चेक करण्याची गरज!! उदयनराजे संतापले, नेमकं प्रकरण काय?


पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना एकदा डोकं चेक करून घेण्याची गरज असल्याचा सल्ला खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जो बोलला त्यामध्ये प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा वाटत नाही, असे वक्तव्य पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

यामुळे यावर आता उदयनराजे भोसले तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाईची मागणी करत आहेत. तीस पेक्षा जास्त संस्था आणि संघटनांनी सोलापूरकर विरोधात आंदोलन केली आहे. समाज माध्यमातून सोलापूरकर विरोधात तीव्र संताप व्यक्त झाला आहे.

ज्या भांडारकर संशोधन मंडळामध्ये सोलापूरकर विश्वस्त होता त्या संस्थेने देखील वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्याचा राजीनामा घेतला आहे. यावर आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतके दिवस लोटल्यानंतरही सोलापूरकर विरोधात साधा गुन्हा देखील दाखल झालेला नाही.

दरम्यान, सोलापूरकरच्या सोसायटी भोवतीच्या पोलीस बंदोबस्ताने वैतागलेल्या शेजारच्यांनी देखील सोलापूरकर विरोधात कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जी वक्तव्य केली आहेत. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त यांनी राहुल सोलापूरकरला प्रथमदर्शनी क्लिनचीट दिल्यानंतर उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला. यामुळे त्याचं डोकं चेक करण्याची गरज असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!