Pune News : पुणे -मिरज दुहेरी रेल्वे मार्गातील नीरा ते लोणंद मार्गाचे कार्य पूर्ण! रेल्वे प्रवास जलद गतीने होण्यास मिळणार मदत…!


Pune News पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मालिकेत टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या प्रकल्पात नीरा ते लोणंद स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. Pune News

आयुक्त रेल्वे सेफ्टी मनोज अरोरा यांनी रविवार (ता. २२) ऑक्टोबर रोजी या ०७.६४ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची सविस्तर आणि सखोल पाहणी केल्यानंतर या सेक्शन मध्ये गाड्या चालविण्यास संमती दिली आहे. Pune News

आता या सेक्शनमध्ये दोन्ही मार्गांवरून रेल्वे वाहतूक सुलभ केली जाईल, ज्यामुळे गाड्या सुरळीत आणि वेगाने धावण्यास मोठी मदत होईल. यावेळी त्यांच्यासोबत निर्माण (कन्स्ट्रक्शन) विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे – मिरज या २७९.०५ किमीच्या रेल्वे मार्गावर आतापर्यंत १७४.६८ किमी दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून यात पुणे ते शिंदवणे, आंबळे ते राजेवाडी, दौंड ते वाल्हा, शेणोली ते भवानी नगर, भवानी नगर ते ताकारी, ताकारी ते किर्लोस्करवाडी, सातारा ते कोरेगाव, पळशी ते जरंडेश्वर,नांद्रे ते भिलवडी, नांद्रे ते सांगली इत्यादी सेक्शनचा समावेश असून राहिलेल्या सेक्शन मध्ये देखील रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाचे कार्य जोमाने सुरू आहे. नीरा – लोणंद सेक्शन मध्ये ट्रॅक दुहेरीकरणा सोबतच विद्युतीकरण कार्य पूर्ण करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!