Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार! पीटीच्या शिक्षिकेचे फोटो व्हायरल करुन विनयभंग..

Pune News पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका महिला शिक्षिकेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन विनयभंग केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे पुण्याच्या महिला सुरक्षेबाबत पुणे पोलीस काही पाऊलं उचलणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाना पेठेत राहणाऱ्या एका महिला पीटी शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाना पेठेत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 97645xxxxx मोबाईल धारक, व इन्स्टाग्राम धारकांवर र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या स्पोर्ट टिचर आहेत. आरोपींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचा फोटो अपलोड करुन त्यावर अश्लील मेसेज पाठवून फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.