Pune News : निगडी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका, २ दलालांना अटक..

Pune News : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याप्रकणी चार पीडित महिलांची सुटका केली.
ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शेखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने निगडी येथील इन्स्प्रिया मॉलमधील फोनीक्स स्पा सेंटरमध्ये केली. याप्रकरणी दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सोनाली विलास माने (वय.३०) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन स्पा मॅनेजर महिला आरोपी, स्पा मालक दिनेश कुमार गुप्ता (वय ३० रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. एक महिला आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
पिंपरी चिंचवड येथील निगडीमध्ये स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत, अशी माहिती माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली. Pune News
निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील इन्स्पेरिया मॉल मधील चौथ्या मजल्यावरील शॉप नंबर ४०३, ४०४ मधील फोनिक्स स्पा येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून चार मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. आरोपींनी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या स्पा सेंटरमध्ये ठेवले होते.
आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना ताब्यात घेऊन निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.